सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने भूमिपुत्र माजी 
कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी जलालपुर मधून सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे प्रतिक्रिया रामदास तांदळे यांनी दिली . तसेच भारतीय जनता पार्टी , कर्जत चे पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे.
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी महादेव मंदिर सभा मंडप व पेव्हर ब्लॉक , जलालपुर ताजु रोड,जलालपूर मधील पवार मळा डांबरीकरण,खेडकर मळा दहा लाख रुपये , स्मशानभूमी मध्ये लाईटची व्यवस्था, जलालपूर मधील स्मशानभूमी सुशोभीकरण दहा लाख खासदार सुजय विखे,भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण,मारुती मंदिर सभा मंडप, राम मंदिर सभा मंडप,सटवाई वस्ती ओपन जिम,हाके मोरे वस्ती सिंगल फेज,ग्रामपंचायत कार्यालय आठ लाख रुपये आदी विकासकामे दिली.तसेच लाडकी बहीण योजनेमुळे माता भगिनिंना मोठा आधार मिळाला.
कार्यतत्पर प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच कर्जत जामखेड मतदार संघाचे विकासाचे जनक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन यांनी केले आहे.






