आ.रोहित पवार प्रचंड विक्रमी मतांनी विजयी होवून आमदार होवून राज्याचे मंत्री होतील : ग्रामपंचायत सदस्य सुधीर बचाटे 

Google search engine

 

२०२४ विधानसभेला आ.रोहित दादा पवार हेच कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार होवून राज्याचे मंत्री होतील अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य सुधीर बचाटे यांनी दिली.

आ.रोहित दादा पवार यांनी मतदार संघातील युवकांना पाठबळ देताना त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. मांदळी गावांसाठी आ.रोहित दादांनी

गावामध्ये स्मशानभूमी कामासाठी १० लाख रुपये निधी ,गावांमधील मंदिरासमोर सभा मंडपासाठी १० लाख रुपये निधी, गावांमध्ये बचाटे वस्तीवर सिमेंट रस्ते , गावांमधील पानंद रस्ते, गावांमध्ये लालगिरी स्वामी मंदिरासाठी ५० लाख रुपये निधी, जलजीवन अंतर्गत १ कोटी पेक्षाही जास्त निधी , प्राथमिक शाळेसाठी १२ लाख रुपये वर्गखोली मंजुरी, ओपन जीम अशी व इतर अनेक विकासकामे मार्गी लावली.

कर्जत जामखेड रोल मॉडेल बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.खोळंबलेल्या विकासकामांना त्यांनी चालना दिली. कुठलाही भेदभाव न करता प्रामाणिकपणे विकासकामे केली.कोरोना काळात उल्लेखनीय काम केले. आ.रोहित पवार निवडून आल्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण देशाला लॉकडाऊनचा सामना , करावा लागला. अशा वेळी त्यांनी धार्मिक स्थळी , शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये,पोलीस मुख्यालये आदी ठिकाणी सॅनीटायजर वाटप , पिपीई, किट आणि मास्कचे वाटप केले .

त्यांनी एमआयडीसी साठी प्रयत्न केला परंतु राजकीय द्वेषापोटी त्यांना अडथळा निर्माण केला गेला. त्यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी भरीव निधी आणला. श्रीगोंदा – जामखेड रस्ता , अहील्यानगर – सोलापूर रस्ता साठी त्यांनी मोठा निधी आणला. अध्यात्मिक आणि धार्मिक अंगांनी मतदार संघाचा विकास केला .

अडचणीच्या काळात त्यांनी सर्वांना धीर दिला असून त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात सर्व कार्यकर्ते मतदार संघात ३० दिवस सक्रिय राहणार आहेत.

२०१९ ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात मोठी विकासकामे केली. सर्व समस्या वैयक्तीत पातळीवर मिटवल्या व कर्जत जामखेड विकासाच्या मार्गावर असणारा मतदारसंघ अशी हळू हळू ओळख निर्माण केली.

कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत .१४ हजार सायकल वाटप, रायटिंग पॅड, कोरोना काळात शाळांसाठी सॅनीटायजर ,शालेय साहित्य वाटप , मास्क वाटप करण्यात आले.

आमदार रोहित दादा पवार आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड मतदार संघामध्ये त्यांनी कोट्यवधीची विकासकामे केली .ग्रामीण रुग्णालय, शंभर बेडचे रुग्णालय, पंचायत समिती ऑफिस, पोलीस क्वार्टर, नगरपरिषद इमारत ,बचत गट, निर्धूर चूल वाटप,शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप ,महिलांसाठी आरोग्य सुविधा व शिबिरे, जलसंधारण, पाणीपुरवठा, अशी अनेक विकासकामे करत आ.रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात विकास गंगा आणली. आ.रोहित दादा पवार हेच २०२४ विधानसभेला कोट्यवधी रुपयांच्या विकासकांना बळावर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया सुधीर बचाटे यांनी दिली

आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार राहनार असून कोट्यवधींच्या विकासकामांतून आ. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली .

यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हे त्यांच्या विजयाचे द्योतक आहे. गेली वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची राज्यात आदर्श मतदार संघ म्हणून ओळख निर्माण केली.

गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे ४५ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले . त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न त्यांनी सोडलवे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी १४ हजार सायकल वाटप केल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आली. शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई , खरीप पीक विमा , शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन , शेतकरी सहलमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. पेरणी, खत व्यवस्थापन , पाणी व्यवस्थापन , लागवड आदी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन , शेतकरी कंपन्यांना ५० कोटी अनुदान देण्यात आले .

महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप , महिलाना निर्धुर चुलीचे वाटप , मुलींसाठी तेजस्विनी बस , मोफत आरोग्य तपासणी शिबिर , यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या व इतर अनेक विकास असा सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे युवा व्यक्तिमत्व आ.रोहित पवार हेच २०२४ चे कर्जत जामखेड चे विधानसभेचे आमदार असतील

राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड एमआयडीसी होईल व येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल

अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली .नाला खोलीकरण , शेतकऱ्यांसाठी गोडाऊन , भजनी मंडळींना भजन साहित्य वाटप , तलाठी कार्यालये , रमाई आवास योजनेअंतर्गत कुटुंबांना घरकुल आदी कोट्यवधींच्या विकासकामांमुळे रोहित दादा हेच २०२४ ला आमदार होतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.