
कर्जत जामखेड मधील मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून करण्यासाठी येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी कमळ या चिन्हापुढे मतदान करण्याचे आवाहन भाजपा कर्जत तालुका सरचिटणीस मंगेश थोरात यांनी केले आहे.
आपल्या मातीच्या विकासासाठी अखंड संघर्ष आणि वचनबद्धता. आपल्या जनतेच्या हक्कांसाठी,कर्जत जामखेडच्या उन्नतीसाठी आता कोणतीही माघार नाही. हे रण पुन्हा उभे राहण्याचे, आपल्या मातीच्या सन्मानाचे असून भूमिपुत्राचा एल्गार , आपला तो आपलाच असतो हे त्यांनी ग्रामविकास करून दाखवून दिले आहे . त्यांना यात जनतेची मोलाची साथ मिळाली आहे.
आ.पवारांनी गंडवागंडवी , निवडणुकीच्या तोंडावर देवदर्शन, गोळ्या बिस्कीट,मोकळ्या कंपास पेटी ,टी शर्ट , इव्हेंट असे लोकांनी मागणी नसलेले उद्योग करून मूळ प्रश्नापासून लोकांचे लक्ष विचलित करणे , बेरोजगारी , निवडणुकीच्या तोंडावर रोजगार मेळावे घेऊन मुलांना भुलवले व ५ वर्षात कोणाला रोजगार देऊ शकले नाही,MIDC करू शकले नाही, खोटं बोल पण रेटून बोल- साहेबांनी मंजूर केलेली अनेक कामे मीच केली आणि नारळ फोडले यात खोटारडे पणा उघड झाला , ५ वर्ष आमदार होते पहिल्याच वर्षी रोहित शर्मा ला आणले असते, ५ वर्षात स्टेडीयम झाले असते , लोकांनी विश्वास ठेवला असता पण यांना निवडणूक आली की सर्व दिसते अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , आपल्या मातीशी असलेले नाळ , आपल्या भूमीत जन्मलेला भूमी पुत्रच ओळखू शकतो , समस्या समजून घेवून उपाययोजना करणे हेच आ.प्रा.रामजी शिंदे साहेबांचे ध्येय आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी जनतेचा सेवक म्हणून काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे. आ .पवारांनी कर्जत जामखेड मधील जनता आणि त्यांचे स्थानिक प्रश्न याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मतदारसंघातील प्रश्नावर आ.पवार कोणतेही लक्ष घालत नाहीत. मतदासंघात अभावानेच दिसणारे पवार आता कर्जत जामखेड करांना नकोसे वाटू लागले आहेत.
भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा जलसंधारण व इतर कामांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. प्रा .राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.







