आ.रोहित दादा पवार यांना मोठे मताधिक्क्य मिळून दुसऱ्यांदा विजयी होतील: अमोल मोरे 

Google search engine

आ.रोहित दादा पवार यांनी खेड परिसरातील सर्वच गावांतून मोठे मत्ताधिकय्य देणार असून आ.रोहित दादांनी विक्रमी निधी दिल्यामुळे खेड व परिसरातील सर्वच गावांचा कायापालट झाला असून आ.रोहितदादांचे आभार व्यक्त करत कर्जत जामखेड मतदार खेड परिसरातील सर्वच गावांतून आ.रोहित दादा पवार यांना सर्वाधिक मते मिळून देण्याचा मानस अमोल मोरे यांनी व्यक्त केला.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले , आ .रोहित दादा पवार हे निवडून आल्यानंतर विकासकामात खेड परिसरातील सर्वच गावांना त्यांनी मोठा निधी देवून न्याय दिला. विकासकामे झफाट्याने केली . कर्जत जामखेड मधील जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे व तसेच कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची देण म्हणून लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघामध्ये प्रचंड मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया अमोल मोरे यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी पत्रकार परिषद घेवून वार्तालाप केला.

यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाला आपले कुटुंब मानले असून आमदार झाल्यानंतर रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड तालुका विकासाच्या बाबतीत नंबर एक बनवला आहे.

आ.रोहित दादांनी खेड गावातील उपरस्ते डांबरीकरण केले. उन्हाळ्यामध्ये टँकर द्वारे मोफत पाणी वाटप चालू केले . खेड गाव मोठे असून देखील त्यांनी मोफत पाण्याचे वाटप करून स्व. खर्चातून पाणीवाटप केले. आ.रोहित दादांचा जनसंपर्क लहानांपासून थोर व्यक्तींपर्यंत आहे. रोहित पवार कर्जत जामखेड मध्ये उभा राहिल्यामुळे इथे झोपलेले अजगर जागे झाले आणि आत्ता इकडे तिकडे फिरण्यासाठी चालू केले. त्यांना आत्ता लोक दिसू लागले आहेत नाहीतर हे फक्त खाण्यासाठीच जागे होतात. हे विधानसभेचे मतदान एकदा झाले की त्यांची अजगरासारखी झोप चालूच झाली ही स्थिती पाहिली होती. पण जसे. आ .रोहित दादा इथे आले तसे यांची झोप उडाली आहे. आ.रोहित दादा दीन दलीत , दुबळ्या समाजाला बरोबर घेऊन चालले आहेत .त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट केला . कोट्यवधी रुपयांची पथदर्शी विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. आज संपूर्ण राज्यात कर्जत जामखेडचे विकासकामांमुळे नाव चर्चेत आहे. आ.रोहित पवार हे निवडून आल्यानंतर मंत्री बनून कर्जत जामखेड मतदार संघ राज्यात एक नंबर बनवतील.