रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने ‘हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. रत्नमाला देशपांडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. संदीप पै, डॉ. आनंद हिप्परकर आदि प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत एतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ साजरा केला जातो. तसेच हा दिवस हिंदी साहित्यिक व्योहर राजेंद्र सिंह यांचा ५० वा वाढदिवस होता म्हणूनच हा दिवस हिंदी दिवसासाठी सर्वोत्तम मानला जात होता.
१४ सप्टेंबरापासून एक आठवडा हिंदी दिनाच्या निमित्त महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने अनेक उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. काव्यवाचन, भित्तीपत्रिका, सुंदर हस्ताक्षर, निबंध आदि स्पर्धा घेण्यात आल्या.
हिंदी दिनाच्या निमित्ताने याप्रसंगी ओंकार कांबळे, श्रद्धा दळवी, तनुजा सुपेकर, वृषाली परदेशी, वैष्णवी परदेशी, वैष्णवी गायकवाड, साक्षी जाधव यांनी मनोगते व्यक्त केली
प्रमुख पाहुणे डॉ. रत्नमाला देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषेचा सन्मान रोज केला गेला पाहिजे. हिंदी देशाची राजभाषा बनली आहे. नऊ राज्याची हिंदी ही मातृभाषा आहे. हिंदी भाषा जगात इंग्रजी, चिनी भाषेनंतर तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी महत्त्वपूर्ण भाषा आहे. ही भाषा वैश्विक भाषा ठरली आहे. २२ देशात हिंदी भाषेतून अध्ययन अध्यापन होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी अधिकाधिक कृतियुक्त अध्यापन व्हावे अशी भूमिका मांडून कृतियुक्त उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकांमध्ये हिंदी भाषेच्या विकासाची भावना वाढविणे हा उद्देश हिंदी दिनाचा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. बेबी खिलारे, प्रा. तेजल बळे, प्रा. किरण भोसले, प्रा. बापू मांडे, प्रा. सुशीला देशमुख यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद परदेशी, सूत्रसंचालन डॉ. बेबी खिलारे यांनी तर आभार प्रा. किरण भोसले यांनी मानले.







