दादा पाटील महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस’ साजरा

0
119
Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी वनस्पतीशास्त्र विभाग, भूगोल विभाग, पर्यावरण विभाग, आणि कर्मवीर ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रा. वैभव वर्डुळे हे प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी मा. मुजीब शेख (जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्रीगोंदा) यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मा. विवेकानंद वाखारे (पोलीस उपअधीक्षक, कर्जत), आणि मा. मारुती मुळूक (पोलीस निरीक्षक,कर्जत पोलीस स्टेशन, कर्जत) या मान्यवरांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधुरी गुळवे, स्वागत डॉ. संगीता कुलकर्णी, सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गायकवाड यांनी तर आभार प्रा. विठ्ठल असवले यांनी मानले