
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे खेळाडू ऋतुजा बर्डे (५६ किलो वजनी गट), ऋतिका बर्डे (५० किलो वजनी गट), प्रतीक्षा कोरे (४५ किलो वजनी गट), संग्राम शिंदे (५० किलो वजनी गट), ओमकार चौगुले (५५ किलो वजनी गट), प्रतीक सुद्रिक (५९ किलो वजनी गट), भाग्यश्री धनवडे (५० किलो वजनी गट), निकिता लोंढे (५५ किलो वजनी गट), रिद्धी शेटे (५६ किलो वजनी गट), प्राची सुद्रिक (६३ किलो वजनी गट), ऐश्वर्या दळवी (४५ किलो वजनी गट) यांची निवड दि. २० ते २२ सप्टेंबर २०२४ रोजी अंमळनेर जि. जळगांव येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे. सदर खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले
या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ.संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, शिलवंत मॅडम महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






