रुईगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. मंगल लाला टुले यांची बिनविरोध निवड

0
574
Google search engine

 

कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. मंगल लाला टुले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच सौ. इंदिरा नीलेश पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सौ. मंगल लाला टुले यांची सरपंच पदावर निवड झाल्यावर अनेक मान्यवरांनी त्यांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.

सरपंच पद निवडीच्या शुभेच्छा देताना परिवर्तन पॅनलचे  अशोक रामचंद्र पवार, रुईगव्हाण विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. संदीप मानसिंगराव जामदार, रुईगव्हाण विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन श्री. शरद नंदाराम जामदार, रुईगव्हाण विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन श्री. बारीकराव बळीबा काळे, रुईगव्हाण गावच्या माजी सरपंच सौ. रोहिणी अशोक पवार, माजी सरपंच सौ. अश्विनी दत्तात्रय जामदार, माजी सरपंच सौ. इंदिरा नीलेश पवार, उपसरपंच सौ. मालन धनाजी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

रुईगव्हाण गावाचा विकास गेल्या साडेतीन वर्षात जसा झाला आहे, तसाच विकास सौ. मंगल लाला टुले यांच्या कारकिर्दीतही होईल असा मला विश्वास वाटतो असे मत रुईगव्हाण विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. संदीप मानसिंगराव जामदार यांनी शुभेच्छा देताना मांडले. सर्व समाज घटकातील लोकांना बरोबर घेऊन रुईगव्हाण गावाचा विकास साधू व सर्वांना समान न्याय देऊ असं मत रुईगव्हाण विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व परिवर्तन पॅनलचे   अशोक रामचंद्र पवार यांनी व्यक्त केले. श्री. राजेंद्र लिंबाजी राणेरजपूत यांनी आपल्या भाषणात नूतन सरपंचांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.