जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा लढाईत आ.प्रा.राम शिंदे साहेबांचा विजय निश्चित : अरविंद नांगरे 

0
85
Google search engine

 

 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाईत आ.राम शिंदे साहेबांचा विजय निश्चित असल्याची खात्री अरविंद नांगरे मा.सरपंच सुपे यांनी दिली.

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा धनशक्ती विरूध्द भूमिपुत्र अशी थेट लढत आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद आ.प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता एकवटली आहे. आमदार प्रा.शिंदे साहेब यांच्या जनसंवाद पदयात्रेने मतदारसंघाचे चित्र बदलून गेले असून आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन व जलयुक्त शिवार मूळे मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करण्याचा जोरदार धडाका लावला आहे.

‘दबाव, दडपशाही, गुंडशाही, हिटलरशाही, हुकुमशाही, विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात आ.पवार यांच्याविरोधात बंड सुरू झाले आहे. पाच वर्षे केलेली जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी आणि गंडवागंडवीच्या विरोधात जनतेचा उद्रेक उफाळून आला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांसह तरूण वर्गाने रोहित पवारांविरोधात एल्गार पकारत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. रोहित पवारांची साथ सोडत या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे.

आ.पवारांविरोधात मोठी लाट सक्रिय झाली आहे. गावागावातील राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. या सर्व घडामोडी मुळे स्थानिक भूमिपुत्र आ.प्रा.राम शिंदे यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ते व गोरगरीब सर्वसामान्य जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार शिंदेंचे पारडे जड झाले आहे . त्यामुळे या निवडणुकीत भाजपा विजयाचा गुलाल उधळनारच अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.