
५ सप्टेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालय , कर्जत येथे झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी हॉलीबॉल क्रीडा स्पर्धमध्ये १४ वर्ष , १७ वर्ष , १९ वर्ष वयोगट मुले व मुली यांच्या स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या.या स्पर्धेमध्ये नूतन माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या सर्वच संघाने मोठी बाजी मारून तालुका स्तरावर आपला विजय संपादन करून त्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक लक्ष्मण मुळीक,तुषार मडके , मनोज बिरंगळ , संजय लोंढे सर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.या उत्तुंग यशाबद्दल सर्व क्रीडापटूंचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष , सचिव,पदाधिकारी मुख्याध्यापक काकडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व लोणी मसदपुर ,पूनरवर, जळकेवाडी, खातगाव , बजरंगवाडी ग्रामस्थ व पालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.







