
दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगर साहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कर्जत येथील मा.मनोज निलंगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातील गरीब विद्यार्थी फंडास आपल्या वाढदिवसानिमित्त पाच हजार रुपये निधी दिला. कर्जत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते प्राचार्यांनी हे ओळखून या मुलांना शैक्षणिक प्रवाहात कसे आणता येईल या यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असतात. या विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. वाढदिवसानिमित्त होणारे अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्याच पैशातून एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण होऊ शकते . ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी महाविद्यालयास पुस्तक भेट देऊन किंवा गरीब विद्यार्थी फंडास मदत करून आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य संजय नगरकर साहेब यांनी केले.
मनोज निलंगे यांच्या सन्मान प्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा.सुभाष चंद्र तनपुरे, महादेव गांगर्डे, प्रा.वसंत आरडे, प्रा.सुनील देशमुख, विलास मोढाळे, प्रा.जयदीप खेतमाळीस प्रा.खंडागळे सर उपस्थित होते.







