दादा पाटील महाविद्यालयात इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

0
142
Google search engine

 

दादा पाटील महाविद्यालयामध्ये पर्यावरण जाणीव जागृती विभाग व भूगोल यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे व कार्यशाळा प्रशिक्षक म्हणून प्रा. अमोल क्षीरसागर व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे होते.

 

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती मूर्ती कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगांमुळे होणारे जल प्रदूषण टाळणे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी माती, शाडू आणि नैसर्गिक रंग वापरून सुंदर गणपतीच्या मुर्त्या तयार केल्या. सदर कार्यशाळेत ८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना आपल्या सण उत्सवांमध्ये पर्यावरणाचे भान ठेवण्याचे असले पाहिजे. अशा कार्यशाळा मुलांमध्ये सृजनशीलता वाढवण्यास मदत करतात तसेच त्यांना पर्यावरणीय संवेदनशील बनवतात. दादा पाटील महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक पर्यावरण जाणीव जागृती विभाग प्रमुख प्रा. वैभव वरडूळे यांनी केले. तर आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ. माधुरी गुळवे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. अगस्तीऋषी तोरडमल यांनी तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विठ्ठल आसवले, प्रा. शरद सूर्यवंशी, प्रा. गणेश बुरटे, प्रा. गोंदके प्रा. अमोल तांदळे, प्रा. भाऊसाहेब ढोले, प्रा. सुरज परदेशी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.