
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये नुकतीच ‘सखी सावित्री समितीची’ स्थापना करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयातील किशोरवयीन गटातील विद्यार्थिनींकरिता मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. उषा राऊत, नगरसेविका सौ. हर्षदा काळदाते, डॉ. स्नेहा ढवळे, डॉ. प्रीती गदादे, सौ. मीनाक्षी कांबळे, माता पालक श्रीमती जयश्री धांडे, विनता जोशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. सुनील देशमुख, प्रा. वसंत आरडे, प्रा. सौ मीना खेतमाळीस आदि मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष सौ. उषा राऊत यांनी जिजामाता, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाईमाता, रजिया सुलतान यांच्या विचाराला पुढे नेणारा चांगला समाज घडवायचा असल्याचे सांगितले. या महापुरुषांचा वसा आणि वारसा सर्व किशोरवयीन मुलींनी बाळगावा असे आवाहनही यावेळी केले
याप्रसंगी डॉ. स्नेहा ढवळे व डॉ. प्रीती गदादे यांनी ‘आहार व आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. पूजा बळे हिने आपले मनोगत व्यक्त केले
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. माधुरी गुळवे यांनी सांगितले की, मुलींनी सर्व बाबतीत सक्षम व्हावं. सुंदरता ही नेहमी वागण्यात, बोलण्यात असावी. काल्पनिक दुनियेतून बाहेर येऊन वास्तविकता ही स्वीकारली पाहिजे. प्रेम करणारे हे खरे आपले आई-वडीलच असतात. आई ही आपली खरी मैत्रीण असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयदीप खेतमाळीस यांनी आभार प्रा. सौ. यादव यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सुलभा पवार व प्रा. संगीता भोसले यांनी केले.
सखी सावित्री मंचाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्री सखी मंचच्या प्रा. सुशीला देशमुख, प्रा. जयश्री जायभाय, प्रा. वृषाली शिंदे, प्रा. त्रिवेणी वाघमारे, प्रा. आरती शेटे, प्रा. अश्विनी घुमरे, प्रा. अदितीे आगवणे, प्रा. कोमल सरवदे, प्रा. शुभांगी तांबे, प्रा. उमा मेंगडे, प्रा. स्मिता पाटील आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली







