साईकृपा कृषि महाविद्यालय , घारगाव येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Google search engine

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय,घारगाव येथे आज दि.१ ऑगस्ट रोजी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर आण्णाभाऊ तथा तुकाराम भाऊराव साठे यांच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना कु. प्रज्ञा बनसोडे या विद्यार्थीनीने केली. यानंतर विद्यार्थी मनोगत मध्ये कु. कावेरी वीर या विद्यार्थीने मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक मनोगत मध्ये प्रा. सदगर सर, निकम सर, पाठक सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतामध्ये साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.निंबाळकर सर यांनी महापुरूषांच्या विचारांची, प्रबोधनाची गरज ही आजच्या समाजातील तरूणाला आवश्यक आहे, कारण व्यक्तीला अन्यायापासुन, जागृत करण्याचे कार्य करण्याची खरी ताकद महापुरूषांच्या विचारात असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला साईकृपा कृषि महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कु. मेघा बांडे या विद्यार्थीनीने उपस्थित सर्वाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.