
अशोक सूर्यवंशी :- प्रतिनिधी
मिरजगाव शहरातील नूतन मराठी प्राथमिक विद्यालय, मिरजगाव येथे आज १ ऑगस्ट रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक सूर्यवंशी यांनी भुषविले या प्रसंगी सर्व शिक्षकवृंदाच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्याचे मनोगत
झाले.विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. संजय निंबाळकर सर यांनी दोन्ही महापुरुषांचे इतिहासातील योगदान सांगितले व विद्यालयाचे शिक्षक श्री.संदीप हिंगणे यांनी या दोन महापुरुषांचे चरित्र आपल्या वक्तव्यातून उलगडले तसेच शिक्षक श्री.शरद शिंदे व श्री.सुरज चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. एजाज शेख आणि श्रीमती प्रतीक्षा सुपेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय निंबाळकर सर यांनी केले व आभार श्री.शरद शिंदे सर यांनी मानले.







