विविध मागण्यांसाठी पिंपळवाडी ग्रामस्थांचे पंचायत समिती , कर्जत येथे उपोषण सुरू  

Google search engine

 

पिंपळवाडी येथे स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्रामसभा घेवून सदर ग्रामसभेमध्ये जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत झालेल्या ग्रामपंचायत पिंपळवाडी चे सर्व खर्चाचे व कॅश बुकचे वाचन करण्यात यावे. व ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे.तसेच १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची व ग्रामनिधीच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी.

तसेच ग्रामपंचायतचे ऑडिट करण्यात यावे.तसेच ग्रामसेवकांची तातडीने बदली करण्यात यावी.या मागण्यांसाठी आज १ ऑगस्ट पासून पंचायत समिती , कर्जत येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.