
मा. पै. प्रशांत दादा कांबळे पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने धनराज गदादे (DM)यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आज बेनवडी येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. वाढदिवसाच्या अवाजवी खर्चाला फाटा देत मा.पै.प्रशांत दादा कांबळे पाटील मित्र मंडळ यांनी सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कमलाभवानी रक्तपेढी , करमाळा यांच्या मदतीने हे शिबिर पार पडले. रक्तदान हेच जीवनदान आहे .
रुग्णालयांमध्ये रुग्णांना रक्ताची कमतरता भासते .जर रुग्णांना वेळेवर रक्त मिळाले नाहीतर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते .रक्त कृतीम पद्धतीने तयार होत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.रक्तदानाला जसे सामाजिक महत्त्व आहे तसे अध्यात्मिक महत्व आहे.या शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले.
यावेळी सोसायटी चेअरमन संतोष गदादे, युवा उद्योजक गोकुळ गदादे, संतोष राऊत, पोपट देशमुख, राजूनाना गदादे, समीर गदादे, हरिभाऊ गदादे, प्रतीक गदादे, तानाजी दुधे, किरण फरांडे,अजिनाथ गदादे, , सचिन गदादे, परसू बिबे , गणेशशेठ गदादे, मस्छिंद्र गदादे,नितीन राऊत , अमोल फोडे , अतुल गदादे, रोहन गदादे, सिद्धेश्वर गदादे उपस्थित होते.







