कोंभळी गणात भाजपकडून मा.सरपंच अनिल सूर्यवंशी प्रबळ दावेदार 

Google search engine

कोंभळी पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या गणातून भारतीय जनता पक्षाकडून माजी सरपंच अनिल चंद्रकांत सूर्यवंशी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभलेले सूर्यवंशी हे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

ग्रामविकासासाठी कटिबद्ध नेतृत्व

चांदे बुद्रुकचे माजी सरपंच म्हणून काम करताना अनिल सूर्यवंशी यांनी ग्रामविकासासाठी अनेक ठोस पावले उचलली. पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्ते सुधारणा, ग्रामस्वच्छता, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण या क्षेत्रात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.

त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीला आदर्श बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून, त्यांच्या कारकिर्दीचा ठसा आजही गावकऱ्यांच्या मनावर कायम आहे.

स्थानिक नेते आणि सरपंचांचा पाठिंबा

अनिल सूर्यवंशी यांच्या उमेदवारीला कोंभळी गणातील अनेक सरपंच आणि माजी सरपंचांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.

त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नंदकुमार नवले,चांदे खुर्दचे सरपंच रामदास सूर्यवंशी, मुळेवाडीचे सरपंच दत्तात्रय मुळे, कौडाणेचे सरपंच प्रवीण सुद्रिक, गुरवपिंपरीचे सरपंच सुनील टकले, रवळगावचे सरपंच तात्या खेडकर, थेरगावचे सरपंच मिनीनाथ शिंदे, नागमठाणचे सरपंच देविदास महानवर, तसेच माजी सरपंच अरुण लामटोळे व भाऊसाहेब गावडे यांचा समावेश आहे*.

हे सर्व नेते लवकरच प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन सूर्यवंशी यांच्या उमेदवारीसाठी निवेदन देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, कोंभळी गणात पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत आहे. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गणातील विविध गावांमध्ये संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत.

जनतेत आपलेपणा राखणारे, समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहणारे आणि विकासाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.

 राजकीय समीक्षकांचे मत

राजकीय समीक्षकांच्या मते, कोंभळी गणात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांमध्ये सूर्यवंशी यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे या गणात भाजपची स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या विजयाची शक्यता अधिक वाढल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.