भांबोरा पंचायत समिती गणातून युवा नेतृत्व भरत लांबोर निवडणुकीसाठी सज्ज

युवक कार्यकर्त्यांच्या संघटनाचे प्रतीक ठरलेले युवा नेतृत्व भरत लांबोर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्जतेचा ध्वज उंचावला आहे. समाजकारण, विकास आणि संघटन कौशल्यामुळे अल्पावधीतच युवकांमध्ये लोकप्रिय झालेल्या भरत लांबोर यांनी आपला मजबूत जनाधार तयार केला असून, त्यांच्याभोवती एकजूट आणि ऊर्जावान युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे.
भारतातील ग्रामीण भागात युवकांच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित होत असताना, भांबोरा गणात भरत लांबोर यांचे उमेदवारीचे चर्चेने वेग घेतला आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवून गावोगावी युवकांना एकत्र आणले. त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठीच्या जनजागृती मोहीमा अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी स्थानिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे.
भरत लांबोर यांच्या नेतृत्वाखालील युवा संघटन हे सध्या भांबोरा परिसरात सक्रिय आहे. अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे राहून “युवकांच्या हक्कासाठी आणि विकासासाठी आवाज” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रचारयात्रा सुरु करण्याच्या तयारीत आहेत.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडूनही भरत लांबोर यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे, तळमळीमुळे आणि जमिनीवरील संपर्कामुळे त्यांच्याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले गेले आहे.
युवा नेतृत्व भरत लांबोर म्हणाले, “ही निवडणूक ही फक्त सत्तेसाठी नाही, तर गावोगावी युवकांचा सन्मान आणि विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आहे.
सध्या भांबोरा पंचायत समिती गणात चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र युवक वर्गाच्या समर्थनामुळे भरत लांबोर यांची मोहीम चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काळात त्यांच्या प्रचाराचा जोर वाढेल अशी अपेक्षा आहे.
संघटन, समाजकार्य आणि युवा ऊर्जेचा संगम , भरत लांबोर यांचे नेतृत्व आता भांबोरा गणातील बदलाचे प्रतीक ठरत आहे







