
कोंभळी पंचायत समिती गणात यंदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर पोपट भाऊ कांबळे यांच्या पत्नी सुरेखा पोपट कांबळे. त्यांच्या उमेदवारीबाबत गावोगावी चर्चेचा विषय रंगत असून, कोंभळी गणातील मतदारसंघात त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसत आहे.
प्रशासकीय अनुभव आणि लोकसंपर्काची जोड
पोपट भाऊ कांबळे यांनी सिंचन विभागात दीर्घकाळ सेवा बजावली असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील अनेक महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबवले. त्यांच्या अनुभवातून शेतकऱ्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याच अनुभवाचा फायदा आता पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना होईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
पक्षाच्या धोरणांशी निष्ठा ठेवून त्यांनी नेहमीच विकासाभिमुख भूमिका घेतली आहे.
सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका
सेवानिवृत्तीनंतर पोपट भाऊ आणि सुरेखा कांबळे दाम्पत्याने समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे, अनेक तरुणांना त्यांनी रोजगार मार्गदर्शन दिले असून, त्यांच्या प्रेरणेने युवकांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.
स्थानिक नागरिक सांगतात, “उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा आणि निर्णयक्षम नेतृत्व असलेले व्यक्तिमत्व म्हणजे पोपट कांबळे. त्यांच्या सोबत असलेल्या सुरेखा ताईंच्या शांत, संयमी पण ठाम नेतृत्वामुळे गणाचा चेहरा बदलू शकतो.”
राजकीय वारसा
पोपट कांबळे यांचे पुतणे श्री .संजय कांबळे हे सध्या खांडवीचे उपसरपंच आहेत पहिल्यापासूनच त्यांच्या कुटुंबियांना राजकीय वारसा आहे.
नागरिकांचा वाढता पाठिंबा
कोंभळी गणातील नागरिकांनी सुरेखा कांबळे यांच्याबद्दल प्रचंड आत्मीयता व्यक्त केली आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवर चळवळ सुरू झाली आहे. गावोगावी कार्यकर्ते भेटीगाठी घेत असून, “गणाच्या विकासासाठी अशा अनुभवी आणि निष्ठावंत व्यक्तीची गरज आहे,” असे मत सर्वत्र उमटत आहे.
स्थानिक महिला मंडळे आणि तरुण कार्यकर्ते देखील त्यांच्या पाठिशी उभे आहेत. “सुरेखा ताईंच्या नेतृत्वाखाली महिलांना पंचायत स्तरावर खऱ्या अर्थाने सशक्त प्रतिनिधित्व मिळू शकेल,” असे मत महिलांनी व्यक्त केले आहे.
विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे शिष्टमंडळाची भेट
सुरेखा कांबळे यांच्या नावाचा औपचारिक प्रस्ताव पक्षपातळीवर मांडण्यासाठी कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच आमदार राम शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीत “कोंभळी गणातील विकास आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनुभवी उमेदवाराची गरज आहे” असा ठोस मुद्दा मांडला जाणार आहे. प्रशासकीय पार्श्वभूमी, लोकसंपर्क आणि कार्यकुशलतेचा विचार करता, पक्षाने सुरेखा कांबळे यांना उमेदवारी द्यावी, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे.
विकासच प्रमुख ध्येय
सुरेखा कांबळे यांनी संवादात सांगितले, “गणाचा सर्वांगीण विकास, प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे आणि महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे.”
त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वगुणांमुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास त्या कोंभळी गणातून प्रबळ दावेदार ठरतील, असा विश्वास स्थानिक राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
कोंभळी पंचायत समिती गणातील ही निवडणूक आता अधिक रंगतदार बनली असून, सुरेखा कांबळे यांच्या नावाने चर्चेला वेग आला आहे. प्रशासकीय अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय विश्वास या त्रिसूत्रीच्या आधारे कांबळे दाम्पत्य या निवडणुकीत नवा आदर्श निर्माण करू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.






