भांबोरा गणातून बंडाभाऊ मोरे भाजपकडून इच्छुक
भांबोरा पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी संचालक, देखरेख संघाचे बंडाभाऊ मोरे यांचे नाव उमेदवारीसाठी प्रबळपणे पुढे येत आहे. अनेक वर्षांपासून संघटनेत सक्रिय राहून त्यांनी पक्षनिष्ठा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून बंडाभाऊ मोरे यांनी पक्षाच्या प्रत्येक लढाईत आघाडीचे काम केले आहे. स्थानिक विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी त्यांनी केलेली सातत्यपूर्ण धडपड जनतेच्या मनात ठसली आहे.
भांबोरा गणातील प्रत्येक गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून, कार्यकर्त्यांची चांगली फौज त्यांच्या मागे उभी आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत राहून त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता, आगामी पंचायत समिती निवडणुकीत बंडाभाऊ मोरे यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षनिष्ठा, नेतृत्वावरचा विश्वास आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे बंडाभाऊ मोरे हे भांबोरा गणातील भाजपचे मजबूत चेहरे म्हणून उदयास येत आहेत.







