स्माईल ग्रुपची 18 वर्षांपासूनची दिवाळी स्नेहमिलनाची यशस्वी परंपरा कायम

Google search engine

सध्याच्या धावपळीच्या व सोशल मीडियाच्या युगात मित्रांना एकमेकांना भेटण्यासाठी खुप कमी वेळ मिळत असला तरी, तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयात (2005 ते 2008) साली पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या स्माईल ग्रुप मधील 15 मित्रांच्या दिवाळी स्नेहमिलनाची यशस्वी परंपरा कायम आहे. अतिशय आदर्शवत अश्या ग्रुपमधील सदस्य हे एकमेकांच्या सुखदुःखात आवर्जून सहभागी होतात.

शैक्षणिक वर्ष 2005-2006 ते 2007-2008 या तीन वर्षात वेगवेगळ्या खेडेगावातील तरुण पदवीचे शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिरात त्यांची मैत्री झाली आणि त्यातूनच स्माईल ग्रुप चा जन्म झाला. सर्व जण आपापल्या नोकरी, व्यवसायात व्यस्त असताना सुद्धा गेल्या 18 वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत ग्रुपमधील सदस्य दोन दिवसासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी होतात. या दोन दिवसात प्रत्येक सदस्य आपल्या आयुष्यातील सुख दुःखे, अडी-अडचणी, एकमेकांसमोर मांडतात आणि त्यातून एक सकारात्मक मार्ग शोधला जातो. हा स्नेहमिलन कार्यक्रम म्हणजे आपले जीवन जगण्याची शिदोरीच आहे, असे ग्रुपमधील सदस्यांचे मत आहे.

सदर ग्रुपमध्ये संपत घंटे (बेनवडी),कुशाबा साळुंके (अळसुंदे),अमोल काटकर (जिंती, ता. करमाळा), अंगद भोंडवे (पिंपळवाडी), वैभव वरडुळे (चापडगाव), अमोल भैलुमे (कर्जत), प्रदीप काळे (देशमुखवाडी), अगस्तीऋषी तोरडमल (बहिरोबावाडी),सतीश अनारसे (अळसुंदे), सोमनाथ बोराडे (तांदुळवाडी, ता. परांडा), नाना पवार (वाघनळी), अनामिक सोनवणे (चापडगाव), प्रवीण हिरभगत (राशीन), प्रदीप वाळके (चांदा) यांचा समावेश आहे.