
नांदगाव येथे नांदगाव क्रिकेट क्लब आयोजित ‘नांदगाव चषक 2025’ ची आज सांगता झाली. अंतिम सामन्यात नांदगाव संघाने बाजी मारत सामना जिंकला.
स्पर्धेला मंगळवार (दि. 21 आक्टोबर) रोजी सुरुवात झाली होती. आज शनिवार (दि. 25 ऑक्टोबर) रोजी विजेत्या संघाना मान्यवारांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत 20 संघांनी सहभाग नोंदवाला.
या स्पर्धेत पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी असे सामने खेळवण्यात आले. अंतिम सामना नांदगाव व शिंदा यांच्यामध्ये अटीतटीचा पाहाव्यास मिळाला.
शिंदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नांदगाव संघाने प्रथम फलंदाजी करत सात षटकात 76 धवांचे तगडे आव्हान शिंदा संघासमोर ठेवले.विजया साठी शिंदा संघाला 77 धवांची गरज असताना शिंदा संघाला 73 धावा करण्यात यश आले मात्र शेवटी अटी तटीच्या सामन्यात नांदगाव संघ 4 धावांनी जिंकून प्रथम बक्षीस मिळवन्यास पात्र ठरला. सोहेल सय्यद व स्वप्निल निकम यांच्या फलंदाजीने नांदगाव संघास फायदा झाला.
युवा उद्योजक महेश तनपुरे यांच्या सौजन्याने देण्यात आलेले प्रथम 31000 रुपयांचे बक्षीस अंतिम सामना विजेत्या नांदगाव संघास शरद तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले. डॉ. प्रविण जगताप व संतोष जगताप यांच्या सौजन्याने देण्यात आलेले दुसरे 21000 रुपये बक्षीस शिंदा संघास डॉ. प्रविण जगताप यांचे हस्ते देण्यात आले.हॉटेल तान्हाजी, कर्जत यांचे मार्फत देण्यात आलेले तृतीय 11000 रुपये बक्षीस अंबिजळगाव संघाने पटकवले व वंचित बहुजन युवा आघाडी चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय भालेराव यांचे कडून आलेले चतुर्थी 5500 रुपये बक्षीस मिरजगांव संघाने जिंकले. श्री रोकडेश्वर तरुण मंडळाच्या वतीने ट्रॉफी चे सौजन्य देण्यात आले.
याच बरोबर आणखी वयक्तिक बक्षिसे दत्ता म्हस्के, विनोद गायकवाड, अतुल किराणा, लक्ष्मण जगताप,बाळासाहेब निंबाळकर,दीपकगायकवाड,समृद्धी ऍग्रोटेक,बागल सर्व्हिसेस कर्जत,घनशाम नेटके, नंदु पवार,सचिन पवार, दत्तात्रय गायकवाड, गणेश निंबाळकर यांच्याकडून देण्यात आली. विविध सौजन्य नाना जंजिरे, अशोक वाळुंज,माऊली गुंजाळ व आण्णा बागल यांनी केले.
हे सर्व सामने चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी संयोजक म्हणून कॅप्टन सलीम सय्यद,स्वप्निल विटकर,दत्ता बागल,स्वार्थिक गायकवाड,ओंकार निंबाळकर, प्रदिप जगताप,आलम सय्यद, कृष्णा गायकवाड, साहिल गायकवाड, सुरज गायकवाड यांनी महत्वाची भूमिका पार पडली. सामन्याची कॉमेंटरी जाणू वायसे व परशुराम बागल यांनी केली.यावेळी सामने पाहण्यासाठी ग्रामस्थ व विविध गावातून आलेले क्रिकेट प्रेमी यांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली.






