
चिलवडी ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक विद्युत खांबावरती लाईट नसल्यामूळे भीक मागो आंदोलन करण्यात आले. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत असमर्थता दाखवत असल्यामुळे आज ग्रामस्थांच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले जेणेकरून ग्रामपंचायतींना या मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यावे यामध्ये कुठलाही राजकीय स्टंट करण्याचा हेतू नव्हता . परंतु सर्व ग्रामस्थांना कुठेतरी सर्वसाधारण सुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळाव्यात म्हणून हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले असे आंदोलन कर्त्यांनी बोलताना सांगितले . ग्रामविकास अधिकारी यांनी येऊन आम्हाला पंधरा दिवसात तुमची मागणी पूर्ण करू असं पत्र देऊन आश्वासित केल्यामुळे आम्ही पंधरा दिवस या गोष्टीची वाट पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे सतीश फरांडे बोलताना म्हणाले .
आंदोलन करत असताना सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले व चांगला प्रतिसादही भेटला याच्यातून एकच माफक अपेक्षा आहे सर्व ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळाव्यात असे बोलताना सतीश फरांडे म्हणाले.






