करमणवाडी परिसरात अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान

Google search engine

 

 

 

 

प्रतिनिधी :-प्रा.राजेंद्र खराडे 

 

कर्जत तालुक्यातील करमणवाडी परिसरात सतत येणाऱ्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.काही ठिकाणी शेतीतील कांदा,मका,कडवळ,भुईमूग ही पिके जमीनदोस्त झाली आहेत.तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदाही भिजला आहे तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटनाही घडल्या आहेत तर काही ठिकाणी शेतीही जलमय झाली आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतीतील पेरणीपूर्व मशागतीही रखडल्या आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.