दादा पाटील महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड

Google search engine

 

 

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात ‘ॲक्विजन बायोसायन्स प्राइवेट लिमिटेड, पुणे’ या कंपनीमधील संशोधन रसायनशास्त्रज्ञ (Research Chemist) या पदासाठी आयोजित मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी दिली. शनिवार, १७ मे २०२५ रोजी रसायशास्त्र विभागाच्या वतीने या परिसर मुलाखतींचे(Campus Interview) आयोजन करण्यात आले. सदर परिसर मुलाखतींसाठी ॲक्विजन बायोसायन्स कंपनीचे डॉ. दिगंबर बनकर (R & D Director), डॉ. शशिकांत भोरखडे( Director of Technical Operations) आणि श्री. शशिकांत काळोंखे (HR & QA Manager) हे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर पदाच्या मुलाखतीसाठी रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी ऑर्गनिक केमिस्ट्री या वर्गातील एकूण ५२ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.त्यातील २५ विद्यार्थ्यांची निवड ‘ संशोधन रसायनशास्त्रज्ञ’ ( R & D ) या पदासाठी योग्यता चाचणी व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात आली. अंतिम फेरीत संकेत, मुळीक, पांडुळे अभिषेक, कैलास थोरात, भाग्यश्री सोनटक्के, ऋतुजा शिंदे, कुंभार आकाश, झिटे रुचिका, यादव अस्मिता, टकले शिवशंकर या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.सदर परिसर मुलाखतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. सदर परिसर मुलाखतीचे नियोजन व आयोजन करण्यासाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पिसे, प्रा. डॉ. अजित इंगळे व प्रा. डॉ. विकास भोसले यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. राजेन्द्र तात्या फाळके, जनरल बॉडी सदस्य व मा. आमदार रोहितदादा पवार, जनरल बॉडी सदस्य मा. अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बप्पाजी धांडे व राजेन्द्र काका निंबाळकर व प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले.