
राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सायबर कॉलेज हॉल, कोल्हापूर मध्ये थेरवडी येथील श्री संदिप दामोदर कांबळे सर यांना सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, प्रसिद्ध कवी रोहित शिंगे, महाराष्ट्र शिक्षक पॅनल. अध्यक्ष दीपक चामे यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कौतुक करत संदीप कांबळे सर यांचे अभिनंदन करत सत्कार केला.तसेच संभाजी गदादे,दामोदर कांबळे,मोहन गोडसे,वसंत कांबळे,विक्रम कांबळे,नवनाथ अडसूळ,सरपंच शामल थोरात , विनोद थोरात , बाळू कांबळे ,मंगेश थोरात , संतोष कन्हेरे , अंबादास पिसाळ , विजय पिसे , धनराज उबाळे , गहिनीनाथ वायदंडे , सहकारी शिक्षक ढवळे सर यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






