शिंदे गावचे राहुल घालमे झाले सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग -१ शिंदे गावात ग्रामस्थांनी काढली डीजेसह गावातून मिरवणूक 

Google search engine

 

 

शिंदे ता.(कर्जत) गावातील, एस. टी. महामंडळात वाहकाची सेवा पूर्ण करून ,सेवानिवृत्त झालेले शेतकरी कुटुंबातील सुनील घालमे ,यांचे चिरंजीव राहुल घालमे यांची सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग-१ या पदी निवड झाली आहे.

काल या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित, महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित )परीक्षेमध्ये राहुल ची वरील पदी निवड झाली आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे तसेच माध्यमिक शिक्षण याच गावात झाले असून, उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय कर्जत, या ठिकाणी पूर्ण केले .त्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि या स्पर्धा परीक्षेत त्याने घवघवित यश मिळविले .

या यशाबद्दल शिंदे गावात ग्रामस्थांनी डीजेसह गावातून मोठी मिरवणूक काढली. यावेळी मोठ्या संख्येने महिला -पुरुष उपस्थित होते. त्यानंतर त्याचा मोठा सत्कार करण्यात आला.

यावेळी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र गुंड यांनी राहुलचे कौतुक केले आणि शुभेच्छा देत म्हणाले की, विद्यार्थ्यांकडे कष्ट करण्याची दानत असावी तरच तो या कष्टाच्या जोरावर अशा प्रकारच्या यशाला गवसणी घालून यश संपादन करू शकतो. सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धां परीक्षेमध्ये चमकताना दिसत आहेत.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, मधुकर घालमे मेजर ,प्रवीण घालमे,दादा घालमे, कृषी सहाय्यक दत्तात्रय सुद्रिक यांनी शब्दरूपी अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी सुभाष घालमे, मोहन घालमे, कैलास घालमे, नितीन घालमे, या गावचे पोलीस पाटील आप्पा घालमे, बाळकृष्ण घालमे, हनुमंत घालमे, दादासाहेब ढेरे, बिटकेवाडी गावचे माजी सरपंच शिवाजी खोमणे ,दादासाहेब बिटके, नाना बिटके तसेच मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया…

 

“माझ्या या यशात,आई मंगल सुनील घालमे, वडील सुनील घालमे आणि बहीण जयश्री गणेश सुद्रिक यांचा सिंहाचा वाटा आहे, स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर माध्यमिक शिक्षणापासूनचं, ध्येय निश्चित करुन अभ्यास करायला हवा तरचं हमखास यश मिळेल ,काल निकाल लागताच वडिलांशी बोलणे झाले, वडील म्हणाले की, घरी येताना एसटी बसने प्रवास कर, कारण ते वाहक होते .यावरून वडिलांची एसटी विषयी आस्था स्पष्ट होते.” राहुल सुनील घालमे -सहाय्यक संचालक ,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग -१.