दादा पाटील महाविद्यालयात व्होकेशनल ‘इंग्लिश स्पीकिंग कोर्स” व ” फॅशन डिझायनिंग कोर्स” चे आयोजन

Google search engine

 

 

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे इंग्रजी विभागाच्या वतीने व्होकेशनल इंग्लिश स्पिकिंग कोर्स दिनांक ५ मे २०२५ ते ५ जून २०२५ या कालावधीत तर फॅशन डिझायनिंग कोर्स १ मे २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहेत.

कोणत्याही शाळेतील किंवा महाविद्यालयातील इयत्ता १० वी च्या पुढील सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पिकिंग कोर्स मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. इंग्लिश स्पिकिंग कोर्स पूर्ण केल्याने विद्यार्थ्यांच्या मनामधील इंग्लिशची भीती दूर होण्यास मदत होते, इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो. शिवाय स्टेज डेरिंगही वाढते. इंग्लिश ग्रामर व होकॅबलरी सुधारते. त्याचबरोबर पब्लिक स्पिकिंग स्किल प्राप्त होते. अशा प्रकारचे या कोर्सचे फायदे आहेत. सदर इंग्लिश स्पिकिंग कोर्स करिता माफक फी आकारण्यात येणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रोफेशनल व तज्ञ ट्रेनर्सचे मार्गदर्शन लाभत आहे. सदर कोर्स मधील प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

१६ ते ४० वर्ष वयोगटातील मुली व महिलांसाठी माफक फीमध्ये फॅशन डिझायनिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिकावर आधारित सदर प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुसज्ज फॅशन लॅब व स्वतंत्र बॅचची व्यवस्था या कोर्सकरिता करण्यात आलेली आहे. फॅशनेबल कुर्ती, पॅन्ट, ब्लाउज डिजाइनिंग आणि शिलाई आदी गोष्टींचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मिळणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील सर्व करिअरसाठी अत्यंत उपयुक्त असणारे हे दोन्ही कोर्स महाविद्यालयात राबविण्यात येत असल्याबाबतचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केले आहे.

इंग्लिश स्पिकिंग कोर्सच्या संपूर्ण माहितीकरिता महाविद्यालयातील समन्वयक प्रा. राम काळे (९८६०६६२१३९) व फॅशन डिझाइनिंग कोर्सच्या माहितीकरिता कु.मावियानाज शेख (८४४६५८९३८६), कु.अंजली थोरात (९१७५०५७०७५) यांच्याशी संपर्क करावा. कर्जत शहर व परिसरातील शाळा महाविद्यालयांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.