
राशीन शहर शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी खालिद अन्सारी , जिल्हा परिषद गट प्रमुख पदी अशोक पवार , शिवसेना उपप्रमुख राशीन शहर पदी शुभम राजपूत यांची निवड करण्यात आली.
त्यांना प्रा.राम शिंदे साहेब , तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके मेजर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड पत्र देण्यात आले.
दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननिय श्री. एकनाथ शिंदे , मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या राशीन शहर शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख , जिल्हा परिषद गट प्रमुख , शिवसेना उपप्रमुख राशीन शहर आदी नियुक्त्या झाल्या आहेत.
सदर नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षाचा आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आंनद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.
निवडीबद्दल खालिद अन्सारी , अशोक पवार , शुभम राजपूत यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .







