
राशीन (ता. कर्जत) येथील नारायण जगताप यांच्या दूध डेअरीवर शेतकऱ्यांनी तब्ब्ल दीड लाख लिटर दूधसंकलन केले होते. शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेले तब्बल ११ कोटींचे अनुदान अद्याप मिळाले नव्हते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले जानेवारी २०२४ मधील पाच रुपये प्रतिलिटर प्रमाणे ६ महिन्यांचे अनुदान रखडले होते. जगदंबा डेअरीमार्फत अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.
याबाबत नारायण जगताप यांनी पाठपुरावाही केला मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी अनुदान
देण्यास मुद्दाम काही कारणास्तव विलंब लावला. अनेक खासगी डेअरीचालकांना याचे अनुदान मिळाले होते, मात्र जगदंबा दूध डेअरी फार्ममार्फत संकलित दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते. त्यासाठी जगदंबा डेअरीचे अध्यक्ष नारायण जगताप यांच्या अधिकाऱ्यांचे दुखणे लक्षात आल्यानंतर नारायण जगताप यांनी विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना याबाबत सांगितले.
प्रा.राम शिंदे यांनी कोणतीही वेळ न घालवता थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांच्या स्पष्ट निर्देशानंतर प्रशासनही सक्रिय झाले आणि अवघ्या काही तासांत ८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, राहिलेली उर्वरित रक्कमही जमा होईल ही खात्री दिली. कठीण काळात सर्वांसाठी उभा राहणाऱ्या प्रा.राम शिंदेंचा नारायण जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन्मान केला. प्रा .राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील अनेक प्रश्न वेगाने मार्गी लागत असल्याने, ते कर्जत-जामखेडकरांसाठी आधारवड’ ठरत आहेत. या सत्कारावेळी जगदंबा डेअरीचे अध्यक्ष नारायण जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे, शिवस्मित उद्योग समूहाचे अध्यक्ष गोकुळ पवार, शहाजी राजेभोसले, विकी जगताप, भाजपाचे जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर व मान्यवर उपस्थित होते.






