युवासेनेच्या वतीने कर्जत येथे २९ मार्चला मोफत सीईटी सराव परिक्षांचे आयोजन

Google search engine

 

 

अकरावी, बारावी व पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवासेना- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे २९ मार्च रोजी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरूण सरदेसाई व अहिल्यानगर जिल्हा प्रमुख प्रशांतजी भाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील विद्यार्थांना ही संधी उपलब्ध होत आहे.

ऑफलाईन पद्धतीने ही परिक्षा घेतली जाणार आहे.ही सराव परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी व फार्मसी शाखांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) साठी उपयुक्त ठरणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणारी हि परिक्षा शनिवार, 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे पार पडणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना तालुका प्रमुख अँड.अविनाश मते यांनी केले आहे.

विनामूल्य नावनोंदणी साठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी-

https://yuvasenacet.com

परीक्षा केंद्र :- समर्थ महाविद्यालय , कर्जत 

दिनांक :- 29 March 2025 

वेळ:- 10.00 ते 01.00