सुरज सुनिल जाधव याच्या वाढदिवसानिमित्त शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन  महंत परमपूज्य श्री.रघुनंदन सरस्वती स्वामी महाराज यांची कार्यक्रमास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती

Google search engine

चि. सुरज सुनिल जाधव याच्या वाढदिवसानिमित्त शुभचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास आशिर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र गाणगापुर दत्त येथिल मठाधिपती महंत परमपूज्य श्री रघुनंदन सरस्वती स्वामी महाराज येणार आहेत .या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी०२:०० वा.श्रीराम ट्रेडर्स, सिद्धटेक रोड, राशिन येथे श्रींचे आगमण होणार असून दुपारी २:३० ते ०४:३० श्री. संजय शेठ जाधव व सह परिवाराचे हस्ते श्रींची पाद्यपुजा व इतर  सोपस्कार करण्यात येणार आहेत .

त्यानंतर सायंकाळी ०५ ते ०७ पर्यंत श्रीराम ट्रेडर्स येथुन श्री जगदंबा देवी मंदिर आईसाहेबांच्या दर्शनासाठी तेथुन जिजाई मंगल कार्यालय, पर्यंत , श्रींची दर्शनफेरी व सोबत श्री दत्त योगीराज आश्रम मुळेवाडी विद्याथी वर्ग सायंकाळी ०७.०० वाजता जिजाई मंगल कार्यालय येथे आशिर्वादपर चि. सुरज सुनिल जाधव यांस शुभचिंतन व उपस्थितांना आशीर्वाद पर अमृतवचन संपन्न होणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ०७:३० ते ०९:३० यावेळेत श्री. गणेशजी शिंदे यांचे व्याख्यान व सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांचा मोगरा फुलला हा कार्यक्रम होईल.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गुरुवर्य श्री. अरविंद शामदेव मुळे सर (कोरेगावकर) सन्माननिय श्री. विठ्ठलराव वाडगे (भाऊसाहेब) (संस्थापक, चेअरमन वृद्धेश्वर मल्टीस्टेट को. ऑ.श्रीगोंदा) ह.भ.प. रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील श्री दत्त योगीराज आश्रम मुळेवाडी ता. कर्जत जि. अहिल्यानगर व सर्व सन्माननीय मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, राशीन उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम समाप्तीनंतर स्नेह भोजन संपन्न होणार आहे.यावेळी व्याख्याते म्हणून गणेशजी शिंदे व गायिका सौ . सन्मिता धापटे -शिंदे यांची साथ लाभणार आहे.

कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन निमंत्रक शिवशंभो मित्र मंडळ, जाधव वस्ती व समस्त जाधव परिवार यांनी केले आहे. हा कार्यक्रम ठिकाण जिजाई मंगल कार्यालय,काळेवाडी रोड , राशिन, ता. कर्जत, जि.अ.नगर येथे संपन्न होणार आहे .