कुळधरण ते लोहकरा पुल रस्त्यावरील खड्डे बुजवून साईट पट्या तात्काळ व्यवस्थित करा  बसपाचे तालुकाध्यक्ष आल्ताफभाई शेख यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक उपविभाग कर्जत यांना निवेदन देवून केली मागणी

Google search engine

 

कुळधरण ते लोहकरा पुल रस्त्यावरील खड्डे बुजवून साईट पट्या तात्काळ व्यवस्थित करा अशी मागणी  कार्यकारी अभियंता सार्वजनिक उपविभाग कर्जत यांना मा. .अल्ताफभाई शेख , बसपा तालुकाध्यक्ष यांनी निवेदन देवून  केली.

यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , कुळधरण ते लोहकरा पुर हा रस्ता अतिश्य खराब झाला असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्यात रस्ता आहे हे समजत नाही. तसेच याच रस्त्याच्या बाजूला साईट पट्टया राहिलेल्या नाहीत. रस्त्याच्या बाजुस साईट पट्टयावर काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत.हा रस्ता हा कर्जत कुळधरण वरुन श्रीगोंदयाला जाण्यासाठीचा बाजार पेठेसाठीचा मुख्य् रस्ता आहे. या रस्त्या वरुन शेतकरी, व्यापारी, वर्ग तसेच विदयार्थी यांच्यासाठी सतत दळण वळणाचा रस्ता आहे. यारस्त्याच्या दुरहअस्थेमुळे आलीकडच्या काळात काही नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.यामुळे कुळधरण ते लोहकरा पुल या रस्त्यावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून साईट पट्टया तयार करण्यात याव्यात अन्यथा बहुजन समाज पार्टी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.