
श्री विठ्ठल विद्यालय माहिजळगाव येथील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी हाके रोनक रवींद्र याची नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झाली.
रोनकच्या या उत्तुंग यशाबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक मानद सचिव लक्ष्मणराव लांगोरे ,यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रविजी पाटील, सचिव माननीय श्री उमेशजी लांगोरे , खजिनदार माननीय श्री अभय कुमार पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त श्री किरण पाटील ,विश्वस्त श्री नंदकुमार लांगोरे, विश्वस्त श्री किशोर लांगोरे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साधना पाटील , पर्यवेक्षक गजेंद्र जगताप आणि सर्व शिक्षक वृंद, माहीजळगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. रोनक यास श्रीमती मीनाक्षी दीक्षित, दत्ता वायाळ, अनुराधा गायवळ यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री विठ्ठल विद्यालयाच्या इतिहासामध्ये नवोदय विद्यालय साठी निवड होणारा रोनक हाके हा चौथा विद्यार्थी आहे.या अगोदर प्रशांत मारुती ठुबे, अभिजीत कांबळे,नवनाथ शिंदेची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली होती.







