श्री हरिदास पावणे सर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Google search engine

 

23 मार्च 2025 रोजी यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री हरिदास नारायण पावणे सर सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी तालुका जामखेड, श्री अशोक विश्वनाथ सूर्यवंशी सर मुख्याध्यापक, मिरजगाव ता कर्जत व श्री लक्ष्मण किसन मुळीक सर ज्येष्ठ शिक्षक माध्यमिक शाळा,लोणी मसदपूर ता.कर्जत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे अध्यक्ष,सचिव,उपाध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय सदस्य त्यांनी मनःपूर्वक आभार मानले .