
आज कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफर स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली., उमेश जपे – अध्यक्ष, भरत तुपे उपाध्यक्ष, आकाश बिडकर सचिव , महेश जाधव कार्याध्यक्ष, तुकाराम सायकर खजिनदार, त्याचबरोबर संचालक पदी बबन कोरे, महिंद्र उघडे,अजित अनारसे, नितीन काळे, सुनील शेटे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा व कॅमेरा पूजन करून करण्यात आली.
अद्यावत प्रणाली,सोशल मीडियाचा वापर, वाढती महागाई व व्यावसायिक नियोजन कस असावा या संदर्भात सागर डाळिंबे यांनी प्रस्ताविकामध्ये मार्गदर्शन केले. महागाईच्या संकटामध्ये वाढलेल्या कॅमेऱ्याच्या किमती शाईच्या किमती पेपरची किंमत इत्यादी बाबी लक्षात घेता आज कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवाढ संदर्भामध्ये चर्चा करून साखरपुडा लग्न समारंभ, वाढदिवस आणि विविध सामाजिक फोटोग्राफीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार नवीन दर पत्रक सर्व छायाचित्रकारांना वाटप करण्यात आली.
छायाचित्रकार व्यावसायिकाचं कुटुंब, मुलांचं शिक्षण, फायनान्स च कर्ज आणि मोबाईल मुळे फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये झालेली कमतरता लक्षात घेता शासन दरबारी याची नोंद घेऊन जसं की लाडकी बहीण योजना अमलात आणली तसेच फोटोग्राफर साठी एखादी योजना शासनाने राबवावी अशी अपेक्षा दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी व्यक्त केली.
यावेळी सचिन पोटे, नितीन कोल्हे,आकाश बिडगर,अजित अनारसे,राजेंद्र खैरे, योगेश लांडगे, कैलास पंडित आदी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमानंतर सर्व छायाचित्रकार बांधवांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब गायकवाड यांनी केले व आभार शिरीष यादव यांनी व्यक्त केले. सर्वांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.यावेळी दौंड येथील पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व फोटोग्राफर उपस्थित होते.







