
प्रतीक बाळासाहेब काळे करपडी यांची नगररचना सहायक अधिकारी (वर्ग-२) पदी निवड झाली
यानिमित्त त्यांचा करपडी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. प्रतीक काळे यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कर्जत येथील अमरनाथ विद्यालयात पूर्ण झाले. अकरावीचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बीई शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. राज्य सरकारने घेतलेल्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभागातून त्याची रचना सहायक गट (अराजपत्रित ) वर्ग-२ खुल्या गटातून निवड झाली. तालुक्यातील मोढळेवस्ती येथे जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक बाळासाहेब काळे यांचा प्रतीक हे चिरंजीव आहे. त्यांना आई-वडील आणि पोलिस उपनिरीक्षक किशोर काळे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रदीप झुंजरुक आदींचे मार्गदर्शन लाभले.







