
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयामध्ये सर्व सामाजिक संघटना, सार्वजनिक वनीकरण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली.सुरुवातीस मुळे हॉस्पिटल व शारदाबाई पवार सभागृह समोर सर्वसामाजिक संघटनेचे शिलेदार, वनविभागाचे आर. एफ .ओ, महाविद्यालयाचे प्राचार्य, एन. एस. एस चे स्वयंसेवक व महाविद्यालयाचा स्टाफ यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
जागतिक वन दिनानिमित्त डॉ.एपीजे अब्दुल कलाम हॉलमध्ये प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून अनिल तोरडमल तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर उपस्थित होते. अनिल तोरडमल यांनी प्रबोधन पर व्याख्यानामध्ये मानवी जीवनासाठी पर्यावरणाचे महत्त्व कसे आहे, वन हे विकासाच्या विरोधात आहे हा चुकीचा समज आहे.विकसित राष्ट्रांचे वनक्षेत्र सर्वाधिक आहे.विकास हा पर्यावरण पूरक असला पाहिजे.वन हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वन नष्ट झाले तर मानवी जीवन नष्ट होईल.राष्ट्रीय वन नितीनुसार 33% वन आच्छादित प्रदेश असला पाहिजे.सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडावी आणि वनक्षेत्राबाहेर ससाधने वाढवावी असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमांमध्ये डी.एफ.ओ पाटील सर यांनी सामाजिक वाढते प्रदूषण विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चा केली .निसर्गासाठी वर्षभर काम करा जंगलवाढीसाठी प्रयत्न करा असा सल्ला दिला.
आर. एफ. ओ. विठ्ठल घालमे यांनी सर्व तालुक्यांमध्ये सर्वसामाजिक संघटना सारख्या संघटना असाव्यात.निसर्ग तयार करा.वड , उंबर पिंपळ या वृक्षाची लागवड करा.जैविक साखळीचा बंदोबस्त मानव करू शकत नाही.पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.झाडावर प्रेम करा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे.जीवनशैलीच्या बदलामुळे निसर्गाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.चंगळवादाचा उदय झाला आहे.सेज सारखे प्रकल्प विकसित भागातच निर्माण झाले.विध्वंसातून विकास चुकीचा आहे.झाडे जगाला जगवण्याचे काम करतात.उद्याचे पर्यावरणाचे भविष्य तरुण पिढीच्या हाती आहे.निसर्ग पूजेची परंपरा नव्या पिढीने जोपासली पाहिजे.असा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी सर्वसामाजिक संघटनेचे शिलेदार ,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील टिचिंग नॉन टीचिंग स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रतिमा पवार व प्रा.राम काळे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.दिग्विजय कुंभार यांनी केले तर आभार प्रा.वैभव वरडोळे यांनी मानले.







