ॲड . योगेश (भैय्यासाहेब) कापरे पाटील कर्जत चे भूमिपुत्र यांची पुणे. दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे याच्या कायदेशीर सल्लागार पदी निवड

Google search engine

 

कापरेवाडी गावाचे श्री. ॲड . योगेश (भैय्यासाहेब) कापरे पाटील कर्जत चे भूमिपुत्र यांची पुणे. दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे याच्या कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली.त्यांना या निवडीचे पत्र आज 19 मार्च 2025 रोजी व्यवस्थापक दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

यावेळी त्यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की , आपला वकिली क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा पोलीस बांधवास होवो तसेच पोलिस व वकील यांच्यातील नाते जवळचे आहे. तसेच पोलिस हे समाजात कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे चोख कामकाज पार पाडतात. संस्थेचे वतीने शासकीय , निमशासकीय, व खाजगी सर्व पत्रव्यवहार याबाबत आपण मार्गदर्शन करणार असल्याने संस्थेस मोठी मदत होणार आहे.

या निवडीबद्दल ॲड.योगेश भैय्या साहेब कापरे पाटील यांचे वकील व पोलीस यांच्याकडून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.