
शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी श्री नागेश्वर विद्यालय थेरगाव येथे नवीन स्वच्छतागृह बांधकाम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी मा. श्री. नितीन भाई देसाई , अध्यक्ष, देसाई ब्रदर्स लिमिटेड ,पुणे मा. श्री रवींद्र धारिया अध्यक्ष , वनराई संस्था पुणे, यांच्या मार्गदर्शनातून श्री नागेश्वर विद्यालय थेरगाव ता. कर्जत या विद्यालयाला नवीन अद्यावत शालेय स्वच्छतागृहाचे बांधकाम हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री.अमित वाडेकर सेक्रेटरी , वनराई संस्था पुणे, मा.श्री.सोमनाथ गलबले – असिस्टंट मॅनेजर देसाई ब्रदर्स लिमिटेड पुणे व रोहन टोपे सेल मॅनेजर देसाई ब्रदर्स पुणे मा.श्री राकेश शेलार समन्वयक- वनराई संस्था पुणे, मानव विकास आणि संवर्धन सेवा मंडळ थेरगाव या संस्थेच्या अध्यक्षा -मा.सौ. मंगलताई जोगदंड, विद्यालयाची माजी विद्यार्थी प्रतिनिधी सौ.शर्मिला साळवे व मा.श्री.संदीप साळवे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विकास आणि संवर्धन सेवा मंडळ थेरगाव या संस्थेचे मानद सचिव मा. श्री विश्वनाथ जोगदंड सर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा श्री राकेश शेलार यांनी केले तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाला हस्तांतरण केलेल्या वास्तू बाबत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री बाळासाहेब दाते सर यांनी कृतज्ञता व्यक्त करत देसाई ब्रदर्स लिमिटेड पुणे आणि वनराई संस्था पुणे यांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मा.श्री राजेंद्र शिंदे सदस्य मा श्री सुभाष महारनवर,मा.श्री अंबादास शिंदे,थेरगाव चे युवा नेते मा श्री बंटी शेठ धुमाळ, मा श्री संभाजी बेद्रे, नागमठाणचे माजी सरपंच नानासाहेब शिंदे, कोकण गावचे सरपंच मा.श्री मोहन गवारे, चिंचोली रमजान चे सरपंच मा.श्री बाबू शेख उपसरपंच मा.श्री बापू साळवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री महेश काळे आदी मान्यवर तसेच थेरगाव, नागमठाण, मांदळी,जोतिबावाडी, चिंचोली रमजान, या पंचक्रोशीतील पालक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोरख शिंदे सर श्री संतोष शिंदे सर व श्रीमती पथवे मॅडम यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती सुजाता पवार मॅडम यांनी मानले.







