
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी विजय संपत शिंदे यांची बिनविरोध निवड झाली .
यावेळी सभेला श्री.बाळासाहेब भाऊसाहेब निंबाळकर , श्री.अण्णा शहाजी बागल ,सौ.कविता घनश्याम नेटके, सौ.सुरेखा लक्ष्मण जगताप ,सौ.लता संजय गायकवाड , सौ.सविता तात्या मांडगे उपस्थित होते .अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच सौ रोहिणी गोरक्ष बागल यांनी काम पाहिले. तर सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती.तापकीर एस.एस यांनी काम पाहिले .
यावेळी बोलताना नूतन उपसरपंच विजय शिंदे म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहोत.
उपसरपंच निवडीबद्दल विजय शिंदे यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







