राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2025 साठी अहिल्यानगर जिल्ह्यातून संदीप लंका दामोदर कांबळे सर यांची निवड

Google search engine

 

महाराष्ट्र शिक्षक पॅनल पुरस्कृत राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघवस्ती , कोरेगाव येथील संदीप लंका दामोदर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 18 मे 2025 रोजी कोल्हापूर येथील सायबर कॉलेज हॉल मध्ये संपन्न होणार आहे.यासाठीचे निवड पत्र 1 मार्च रोजी MSP चे राज्याध्यक्ष दीपक चामे व राज्य सचिव सतीश कोळी , राज्य समन्वयक विकी येलमटे , गोपाल भुतापल्ले , रामसिंग महाजन , तसेच MSP जिल्हा समन्वयक मनीषा पाटील यांच्या हस्ते संदीप कांबळे सर यांना देण्यात आले.

पुरस्कार निवडीबद्दल सरपंच शामल थोरात , विनोद थोरात , संतोष पोकळे , मंगेश थोरात , कांतीलाल थोरात ,तात्यासाहेब थोरात , निखिल कांबळे ,महाराज पोकळे, दादा विटकर , बाळासाहेब कांबळे , संभाजी गदादे , पोपट कांबळे , अजिनाथ पवार , हनुमंत विटकर , रमेश सोनवणे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.त्यांना विस्तार अधिकारी शिक्षण उज्ज्वला गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.