
छावा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी कोपर्डी येथे दाखवण्यात येणार असून कोपर्डी चे लोकनियुक्त सरपंच शांतीलाल सुद्रीक यांच्या सौजन्याने शिवजयंतीचे औचित्य साधून कोपर्डी येथे शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री ठीक 08.00 ते 10.30 यावेळेत भैरवनाथ मंदिर येथे सर्व ग्रामस्थ , महिलांसाठी हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे.
हा कार्यक्रम कोपर्डी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ , महिलांसाठी आहे. यामुळे कोपर्डी येथे सांस्कृतिक आणि धार्मिक अनुभव मिळणार आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने रिलीजच्या आठवड्यातच धुमाकूळ घातला आहे.
आता हा सिनेमा कोपर्डी येथे नागरिकांना हा सिनेमा मोफत पाहता येणार आहे.आयोजकांनी सर्व ग्रामस्थ , महिला यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम कोपर्डी व परिसरातील लोकांसाठी एक आनंददायी आणि सांस्कृतिक अनुभव असणार आहे.







