
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित प्रा .सचिन रामचंद्र पुराणे यांचे शिक्षक क्षमता वृद्धी साठी 500 शिक्षकांना प्रशिक्षण
देण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. यात कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसाचे प्राध्यापक सचिन रामचंद्र पुराणे सर यांनी पिंपरी चिंचवड मधील जवळजवळ 500 माझ्यासारख्या सीनियर शिक्षक वर्गांना प्रशिक्षण दिले. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळांमध्ये सचिन सरांचे कौतुक होत आहे सर्व सीनियर लोक असून सुद्धा सर्वांना दीड-दोन तास संबोधित करून खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले
यावेळी सर्वांनी सरांचे कौतुक करत प्रा .सचिन पुराणे सर भविष्यात खूपच यश प्राप्त करतील आपल्या आई-वडिलांचे आपल्या गावाचे नाव रोशन करतील यात तीळ मात्र शंका नाही अशी आशा व्यक्त केली.
• • पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित आपल्या गावचे एक तरुण सुपुत्र “मूर्ती लहान पण कीर्ती महान “असे प्राध्यापक सचिन रामचंद्र पुराणे सर यांनी आपल्या मधुर वाणीने पिंपरी चिंचवड मधील जवळजवळ 500 माझ्यासारख्या सीनियर शिक्षक वर्गांना प्रशिक्षण दिलेले आहे त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळांमध्ये सचिन सरांचे कौतुक होत आहे सर्व सीनियर लोक असून सुद्धा सर्वांना दीड-दोन तास मधुर वाणीने संबोधित करून खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले
खरोखरच मी सांगतो की सचिन भविष्यात खूपच यश प्राप्त करेल आपल्या आई-वडिलांचे आपल्या गावाचे नाव रोशन करेल यात तीळ मात्र शंका नाही सचिन सरांना माझ्याकडून पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
प्रा.विकास झोडगे सर , समता विद्यालय , भोसरी







