
कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायकरवाडी येथे थेरगावचे विद्यमान उपसरपंच मा.किरण शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , रायकरवाडी येथे विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे याकरिता त्यांनी स्व .खर्चाने शाळेसाठी बोअरवेल घेवून दिला. कन्या रत्न झाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची शाळेतच सोय निर्माण व्हावी यासाठी त्यांनी आज बोअरवेल घेवून दिला .उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने बोअरवेल द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार असल्याचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
शिक्षणाप्रती जागरूक असणारे तसेच अभ्यासू आणि तितकेच शांत संयमी व उदार व्यक्तिमत्व थेरगावचे मा.उपसरपंच माननीय श्री.किरण शिंदे यांची शाळेविषयी भूमिका नेहमीच आस्थेची आणि उदारतेची राहिलेली आहे याचाच आज पुन्हा प्रत्यय आला . रायकरवाडी शाळेतील बालमित्रांच्या भाग्याने बोअरवेलला चांगले पाणी देखील लागले श्री किरण शिंदे यांचे सर्व शिक्षक , पालकवृंद आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून आभार मानले.







