दादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती साजरी

0
107
Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रसंत गाडगे महाराज’ यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कैलास रोडगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. कैलास रोडगे यांनी संत गाडगे महाराजांचा जीवनपट, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेला समाजाला संदेश विशद केला.

अध्यक्षीय मनोगतात उप प्राचार्य डॉ. संजय ठुबे यांनी रयत शिक्षण संस्था व गाडगे महाराज यांच्यामध्ये असलेला ऋणानुबंध उलगडून दाखविला.

या कार्यक्रमासाठी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय शेंडे, प्रा. वैभव वर्डूळे, एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी प्रा. वाल्मीक कापसे, प्रा. अमोल थोरात व एन.एस.एस चे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. वाल्मिक कापसे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले