
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धर्मवीर चौक , खराडे वस्ती , भोसे येथे ह.भ.प.अभिजित महाराज गिरी यांचे हरिकिर्तन संपन्न होणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , भोसे यांनी दिली.
19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी श्रींच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. व 20 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटप होणार आहे.







