
त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा फाटा, जि.अहिल्यानगर, या ठिकाणी दिनांक 14 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील दुरगाव शाळेतील कबड्डी मोठा गट मुली व कबड्डी लहान गट मुली या संघांना विजेता पदाचा बहुमान मिळाला.
विजयी संघाला शाळा पातळी ते जिल्हा पातळी पर्यंत, शाळेचे मुख्याध्यापक रमेश सुपेकर, शाळेचे क्रीडा मार्गदर्शक बजरंग गोडसे ,दशरथ देशमुख, काशिनाथ जायभाय विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादा गदादे ,अमोल मांडगे , बाळकृष्ण काळे ,आबासाहेब टकले, विलास बनकर, लता शिंगाडे, संगीता जगदाळे, सुजाता माऊलकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .शाळेच्या उत्तुंग कामगीरी बद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे ,शिक्षण विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड, दशरथ धादवड , सुरेखा कावरे,सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य ,ग्रामस्थ यांनी विजयी संघाचे आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून सर्व विजय खेळाडू व मार्गदर्शक यांची ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे सगळ्यांचा शाल, फेटे बांधून सत्कार करण्यात आला.
विजेते संघातील खेळाडू
मोठा गट (मुली) –
साक्षी सातव (संघनायक), खुशी बिनवडे, श्रावणी मोहिते, संध्या हरेल, श्रावणी धांडे, वैष्णवी कुलथे, आफ्रिन शेख, देवयानी केंदळे, सृष्टी जायभाय, वैष्णवी मोहिते, जोया शेख व सोफिया शेख .
लहान गट( मुली) –
कशीश शेख (संघनायक) प्राप्ती कुलथे, श्रावणी खरात,दिव्या भगत, तेजश्री कुलथे,प्रेरणा जायभाय,दुर्गा जायभाय,प्रगती धांडेकर, मुस्कान शेख, सृष्टी निंबाळकर, सोफिया शेख,व सनम शेख.






