छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जळकेवाडी येथे शिवनेरी तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या तर्फे रक्तदान शिबिर व भव्य मिरवणूक

Google search engine

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जळकेवाडी येथे शिवनेरी तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या तर्फे रक्तदान शिबिर व भव्य मिरवणूकीचे आयोजन 19 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी मूर्तीस्थापना व मूर्तीपूजन होणार आहे. त्यानंतर सकाळी 10.00 ते 05.00 भव्य रक्तदान शिबिर पार पडणार आहे. यावेळी सर्व रक्तदात्यांस भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ,06.30 ते 09.00 यावेळेत भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे.

सायंकाळी 09.00 वाजता सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती व त्यानंतर सर्व ग्रामस्थांना महाप्रसाद देवून कार्यक्रम संपन्न होणार आहे.रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजक व ग्रामस्थांनी केले आहे.